वसईत ‘ठाकूर’राज, बहुजन विकास आघाडीला स्पष्ट बहुमत

June 16, 2015 1:45 PM1 commentViews:

hitendra thakur16 जून : वसईमध्ये पुन्हा एकदा ‘ठाकूर’राज कायम असणार आहे. वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांच्या विकास आघाडीने जोरदार शिट्टी वाजवत सत्ता काबीज केलीये. बहुजन विकास आघाडीला सलग दुसर्‍यांदा स्पष्ट बहुमत मिळालंय.

115 जागांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने बहुमताचा आकडा पार करत 83 जागा पटकावल्या आहेत. अजूनही काही जागांवर आघाडीवर आहे. तर शिवसेनेसह सर्वपक्षीय विरोधकांना अवघी दोन अंकी संख्याही गाठता आलेली नाही.

शिवसेनेला फक्त 3 जागांवर समाधान मानावे लागले तर भाजपच्या पारड्यात फक्त एकच जागा पडलीये. गेल्या निवडणुकीत बविआला 59 जागा मिळाल्या होत्या. यावर्षी बविआने जोरदार मुसंडी मारत विरोधकांना धोबीपछाड दिलाय.

वसई विरार पालिकेचा निकाल
बविआ- 83
शिवसेना- 3
भाजप – 1
अपक्ष -2

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • नितीन सवे

    bva १०७
    सेना ५

close