ठाण्यात शस्त्रसाठा जप्त : एकाला अटक

November 12, 2009 12:42 PM0 commentsViews: 5

12 नोव्हेंबरठाण्यातून एका व्यक्तीकडे एक कार्बाईन, 10 पिस्तुलं आणि 50 काडतुसं जप्त करण्यात आली आहेत. ठाणे एटीएसने यासंबधी एका कैलास सिंग या व्यक्तीला अटक केली आहे. कैलास सिंग हा शस्त्रांस्त्रांचा व्यापारी असण्याची शक्यता आहे. तसंच ठाण्यातील एका गँगला तो ही शस्त्र विकण्यासाठी आला असल्याचं समजतं. मुंबई हल्ल्याल्या एक वर्ष पूर्ण होत असताना मुंबईत अशाप्रकारे शस्त्रास्त्र घेऊन फिरणार्‍या तरुणाला अटक झाल्याने पोलिसही सतर्क झाले आहेत. सिंगला 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

close