फियान वादळातील मृतांच्या कुटुंबाला 1 लाखाची मदत – मुख्यमंत्री

November 12, 2009 12:44 PM0 commentsViews: 3

12 नोव्हंबर फियान वादळात मृत पावलेल्यांच्या कु टुंबियांना 1 लाख रुपयांची तातडीची मदत मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी जाहीर केली आहे. तर जखमींना 10 ते 50 हजारांची मदत देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. कोकणात उद्धवस्त झालेल्या पिकांचे पाच दिवसांत पंचनामे करण्याचे आदेश संबंधित जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. येत्या मंत्रिमडंळाच्या बैठकीत नुकसान भरपाईचा प्रस्ताव ठेवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत केली.

close