दहावीत 35 टक्के मिळवणार्‍या कोल्हापुरच्या पठ्‌ठ्याला सायकल भेट

June 16, 2015 5:21 PM0 commentsViews:

संदिप राजगोळ आणि प्रणाली कापसे, मुंबई

16 जून : दहावीच्या परीक्षेत अगदी कट टू कट 35 टक्के मिळवून भलताच फेमस झालेल्या कोल्हापूरच्या त्या पठ्ठयाची आता चक्क राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनीही दखल घेतलीय. एवढंच नव्हेतर त्याला बरोबर काठावर पास झाला म्हणून सरकारतर्फे सायकलही भेट दिली आहे.

indrajit moreदहावीच्या परीक्षेत 35 टक्के घेऊन मोठा तीर मारलेल्या कोल्हापूरच्या इंद्रजीत मोरेची गावभर लागलेली पोस्टर्स आपण व्हॉटस्‌ऍपवर पाहिलीच होती…पण एवढी शोभा अपुरी की काय म्हणून आता राज्याच्या शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीही त्याचा चक्क सायकल देऊन गौरव करायचं ठरवलंय म्हणे…तुम्हीच ऐका राज्याचे शिक्षणमंत्री तावडे या 35 परसेंट झिंदाबाद पोस्टर बॉयचं कसं तोंड भरून कौतुक करताहेत ते….

कोणत्याही परीक्षेत अगदी पास होण्यापुरतेच मार्क मिळवणे हा दुर्मिळ योग नक्कीच आहे. त्याची बातमीही व्हायला काहीच हकरत नाही….आम्हीही एक वेगळी बातमी म्हणून त्याची दखल घेतली…

आता कधी नव्हे ते 35 टक्के मिळवले म्हटल्यावर या कोल्हापुरी भावाची सर्वदूर चर्चा तर होणारच होती. आणि ती झाली देखील…पण काठावर पास होण्याच्या पराक्रमाबद्दल थेट शिक्षणमंत्र्यांनी या पठ्‌ठ्याचा सायकल देऊन यथोचित गौरव करणे म्हणजे जरा जास्तीत झालं नाही. थोडक्यात कायतर पोर्‍या नंबरी तर मंत्री दसनंबरी असंच इथं खेदाने नमूद करावसं वाटतं…असो…पण आपल्या मंत्रिमहोदयांनी सायकल वाटपाची हीच तत्परता खेडेगावातून शिक्षणसाठी पायपीट करणार्‍या गरजू मुलींसाठी दाखवली तर आम्हालाही नक्कीच आनंद होईल.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close