मुंबईसह राज्यभरात उद्या रिक्षाचालकांचा बंद!

June 16, 2015 9:47 PM0 commentsViews:

Auto Rickshaw

16 जून : मुंबईसह राज्याभरात उद्या(बुधवारी) रिक्षाचालकांनी काम बंद आंदोलन पुकारला आहे. राज्यभरातले सुमारे 15 लाख रिक्षाचालक, मालक या संपात सहभागी होणार आहेत. हकीम समितीचा अहवाल रद्द झाल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन केलं जाणार आहे. तसंच राज्यभरात मोठ्या प्रमाणावर चालणार्‍या खाजगी कंपन्यांच्या टॅक्सी बंद केल्या जाव्यात अशीही रिक्षाचालकांची मागणी आहे.

हकिम समितीच्या अहवालावर गेल्या वर्षात राज्य सरकारने अमलजावणी सुरू केली होती. विशेषता रिक्षा चालकांची सामाजिक स्थिती बदलण्यासाठी ही समिती उपयुक्त होती. पण आता राज्य सरकारनं पुुन्हा नवी समिती नेमलीये, ज्यात रिक्षा चालक मालक यांच्या प्रतिनिधींचा समावेश नाही. त्याचबरोबर राज्यभरात मोठ्या प्रमाणावर चालणार्‍या खाजगी कंपन्याच्या टॅक्सी रिक्षां यांना ही बंद केलं जावं. या मागण्यासाठी हे आंदोलन केलं जाणार आहे.

उद्याच्या संपात एकट्या मुंबईत तब्बल 1 लाख रिक्षा चालक काम बंद करतील असं मत ‘मुंबई रिक्षा, टॅक्सीमेन्स युनियन’चे अध्यक्ष शशांक राव यांनी मांडलं. या आंदोलनाचा फटका विशेष: मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई या सगळ्या भागांना बसणार आहे. त्यामुळे संपाच्या पार्श्वभूमीवर उद्या एस टीच्या वतीनं 100 जादा बसेस सोडल्या जाणार आहेत. तसंच गरजेनुसार जादा गाड्या सोडण्याची मुभा स्टेशन मास्तरांना देण्यात आल्याची माहिती बेस्टच्या वतीनेही देण्यात आली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close