सुनिल गावसकर आणि गुंडाप्पा विश्वनाथ यांचा सत्कार

November 12, 2009 2:06 PM0 commentsViews: 39

12 नोव्हेंबर भारतीय क्रिकेटचे 1970 ते 1980 च्या काळात प्रमुख आधारस्तंभ असलेले सुनील गावसकर आणि गुंडाप्पा विश्वनाथ या जोडीचा गुरुवारी मुंबईत सत्कार करण्यात आला. वयाची साठ वर्ष पुर्ण केल्यानिमित्तानं त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी या दोघांनाही 60 ग्रॅमची सोन्याची बॅटही देण्यात आली. या कार्यक्रमाला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि बीग बी अमिताभ बच्चन यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय मिलिंद रेगे, वासू परांजपे, चंद्रशेखर भागवत, अजित वाडेकर असे क्रिकेटमधले दिग्गजही उपस्थित होते. या कार्यक्रमात सनी-विशीचा क्रिकेटमधील प्रवास, त्यांचा खेळाची शैली यांचा आढावा घेण्यात आला. मुंबईतल्या वांद्रे इथल्या रंगशारदा नाट्यगृहात हा कार्यक्रम रंगला.

close