भाजप अध्यक्षपदी गडकरींची वर्णी लागण्याची शक्यता

November 13, 2009 9:55 AM0 commentsViews: 1

13 नोव्हेंबर नितीन गडकरी यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी वर्णी लागू शकते. लोकसभा निवडणुकीनंतर, भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्याचे संकेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं दिले होते. त्यानुसार राजनाथसिंह यांना अध्यक्षपदावरुन दूर करुन त्यांच्या जागी गडकरींची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड होण्याची शक्यता आहे. गडकरीनी गुरुवारी भाजप संघटनेचे सरचिटणीस रामलाल यांची भेट घेतली. महत्वाचं म्हणजे सरसंघचालक मोहन भागवतही गुरुवारी दिल्लीत होते. पण यावेळी त्यांची भेट झाली नसल्याचं समजतंय. त्यांच्या बरोबरच भाजपाच्या अध्यक्ष पदासाठी सुषमा स्वराज, अरूण जेटली आणि वेंकय्या नायडू या नेत्यांची नावं प्रामुख्यानं चर्चेत आहेत. हे तिघंही आहेत अडवाणी कॅम्पचे. पण भाजपचा नवा अध्यक्ष हा दिल्ली बाहेरचा असावा, असं मत आर. एस. एस. प्रमुख मोहन भागवत यांनी व्यक्त केलं होतं. त्यामुळे या तिघांचीही निवड होण्याची शक्यता धूसर आहे. या स्पर्धेमध्ये गोव्यातले मनोहर पर्रीकर, गुजरातचे नरेंद्र मोदी यांचाही समावेश आहे.

close