भारत-श्रीलंका मॅचच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक

November 13, 2009 12:44 PM0 commentsViews:

13 नोव्हेंबर लाहोरमध्ये श्रीलंकन टीमवर झालेल्या हल्ल्यासारखा हल्ला पुन्हा अहमदाबादमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारत-श्रीलंका दरम्यान सोमवारपासून सुरू होणार्‍या पहिल्या टेस्ट मॅचसाठी गुजरात पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली. दहशतवाद्यांच्या हिट लिस्टवर अहमदाबाद असण्याची शक्यता आहे. तसा इशाराही केंद्रीय गृहमंत्रालयाने दिला आहे. त्यामुळे अहमदाबाद शहरात बाईक्सची कसून तपासणी करण्यात येत आहे. लाहोर हल्ल्याच्या वेळी मोटर बाईकचा वापर केला गेला होता.

close