एमसीएचा सामना कोण जिंकणार ?, आज होणार मतदान

June 17, 2015 9:21 AM0 commentsViews:

mca17 जून : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आङे. दुपारी तीन ते संध्याकाळी 6 अशी मतदानाची वेळ आहे. त्यानंतर मतमोजणीला सुरूवात होईल. अंतिम निकाल साधारण रात्री साडेदहावाजेपर्यंत लागण्याची शक्यता आहे.

अध्यक्षपदासाठी बाळ महाडदळकर गटातर्फे शरद पवार तर क्रिकेट फर्स्टतर्फे विजय पाटील मैदानात आहेत. यावेळी शिवसेना शरद पवारांच्याविरोधात उभी ठाकल्याने निवडणुकीत चांगलीच रंगत निर्माण झालीये. गंमत म्हणजे सत्तेत एकत्र असणारे सेना-भाजप क्रिकेटच्या मैदानात मात्र परस्परांच्या विरोधात लढत आहेत. त्यामुळेच एमसीएचं मैदान कोण मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

अशी होणार एमसीएची निवडणूक
- मतदान : दु. 3 ते संध्या. 6 वा.
- निकाल : रात्री 10.30वा.

एमसीएचा सामना
- अध्यक्षपदासाठी शरद पवार विरुद्ध विजय पाटील
- बाळ महाडदळकर गटाकडून शरद पवार रिंगणात
- क्रिकेट फर्स्ट गटाकडून विजय पाटील रिंगणात
- शिवसेनेचा विजय पाटील यांना पाठिंबा
 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close