रिक्षाचालकांचा बंद, प्रवाशी पुन्हा वेठीस

June 17, 2015 9:34 AM0 commentsViews:

mumbai auto rikshaw17 जून : मुंबईसह राज्यभरात रिक्षाचालकांनी आज (बुधवारी) ‘मीटरडाऊन’ केलंय. रिक्षाचालकांनी आज एकदिवशीय संप पुकारलाय. मुंबईत कामगार नेते शरद राव यांची रिक्षा संघटना एका दिवसाच्या लाक्षणिक संपावर आहे. जवळपास 1 लाख रिक्षा संपामध्ये सहभागी झाल्यामुळे ऐन सकाळी चाकरमान्यांचे हाल झाले.

कायद्यानुसार कोणतीही मान्यता नसतानाही व्यवसाय करणार्‍या ‘ओला’, ‘उबेर’ या कंपन्यांवर बंदी घालावी, हकीम समिती पुन्हा स्थापन करून त्या समितीने केलेल्या शिफारशी स्वीकाराव्यात आणि रिक्षा-टॅक्सीचालकांना ‘सार्वजनिक कर्मचार्‍या’चा म्हणजेच पब्लिक सर्व्हट्सचा दर्जा द्यावा, अशा त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. मुंबई ऑटोरिक्षामेन्स संघटनेसह राज्यातील विविध संघटनांनी आज रिक्षा बंद आंदोलन पुकारलंय.

विशेष म्हणजे याच मागण्यांसाठी सोमवारीच स्वाभिमान संघटनेने आंदोलन करत प्रवाशांना वेठीला धरलं होतं. मात्र, रिक्षा चालकांच्या या संपात शिवसेना सहभागी नाहीये. मुंबई ऑटोरिक्षामेन्स संघटना ही रिक्षाचालकांमधील सर्वात मोठी संघटना असल्याने राज्यभरात या बंद आंदोलनाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

दरम्यान, प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने मुंबईत 100 बसेस सोडल्या आहेत. गरजेनुसार जादा गाड्या सोडण्यात येणार आहे. मात्र, ऐन सकाळी कार्यालय गाठण्यासाठी चाकरमान्यांचे हाल झाले आहे. तासभर ताटकळत चाकरमान्यांना कसंबसं ऑफिस उशिराच गाठावं लागलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close