एफटीआयआयमध्ये ‘महाभारत’ सुरूच, सहाव्या दिवशीही विद्यार्थ्यांचा संप सुरूच

June 17, 2015 11:31 AM0 commentsViews:

FTII and gajendra17 जून : राष्ट्रीय फिल्म आणि टेलीव्हिजन (FTII) चा संप लगेचच मिटण्याची शक्यता नाही. आज (बुधवारी) या संपाचा सहावा दिवस उलटलाय. मात्र, विद्यार्थ्यांनी माघार घेण्यास नकार दिलाय.

गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीविरोधात एफटीआयआय चे विद्यार्थी करत असलेल्या आंदोलनाची दखल अखेर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने घेतली. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या पत्राला माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं उत्तर दिलं. या प्रकरणाविषयी चर्चा करायला विद्यार्थ्यांनी पुढे यावं असं आवाहन मंत्रालयाच्या वतीने करण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांनी संपाचा पुनर्विचार करून संस्थेचं शैक्षणिक कामकाज चालू द्यावं असं विद्यार्थ्यांना सांगण्यात आलं आहे. एफटीआयआयचे संचालक डी.जे.नरेन यांनी यासंबंधी माहिती दिली. मात्र, विद्यार्थ्यांची ‘आम्ही माघार घेणार नाही आणि संप सुरूच राहणार आहे’ असं म्हटलं .पण सरकारशी चर्चा करायला विद्यार्थ्यांशी तयारी दर्शवली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close