कुर्बानच्या पोस्टर्सला शिवसेनेचा आक्षेप

November 13, 2009 12:46 PM0 commentsViews:

13 नोव्हेंबर सैफ अली खान आणि करीना कपूरचा 'कुर्बान' सिनेमा रिलीजआधीच वादात सापडला आहे. या सिनेमाच्या अश्लील पोस्टर्सना शिवसेनेनं आक्षेप घेतला आहे. शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी अंधेरीमध्ये सिनेमाविरोधात निर्दशनं केली. सुरुवातीला या महिलांनी पोस्टरवरील करीना कपूरच्या फोटोला कपड्यांनी झाकून आपला विरोध व्यक्त केला, त्यानंतर पोस्टर्स फाडली. दरम्यान, ही पोस्टर्स काढली नाही, तर करीनाला तिच्या घरी जाऊन साडी देण्यात येईल, असा इशारा शिवसेनेच्या महिला पदाधिकार्‍यांनी दिला आहे.

close