थुंकणार्‍यांनो सावधान, थुंकल्यावर होईल 1 हजारांचा दंड !

June 17, 2015 12:55 PM0 commentsViews:

anti spiting17 जून : रस्त्या असो अथवा रेल्वेचा पूल किंवा कोणताही भिंताचा रंगवणार्‍या महाभागाचं आता तोंड बंद करण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसलीये. कुठेही थुंकताना सापडल्यावर 1000 ते 5000 हजारांचा दंड भरपाई केली जाणार आहे. त्याचबरोबर एक दिवस सामाजिक संस्थेसाठी काम करण्याची शिक्षाही देण्यात येणार आहे.

थुंकणार्‍यांवर कारवाईसाठी आता नवा कायदा तयार करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळानं डॉ. दिपक सावंत यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलीये. त्यासाठी नवा अँटी स्पिटिंग कायदा सहा महिन्यात लागू होण्याची शक्यता आहे. या नव्या कायद्याला राज्य मंत्रीमंडळानं मंजुरी दिलीये. थुंकताना सापडल्यास पहिल्यांदा 1000 रुपये दंड आणि एक दिवस सामाजिक संस्थेसोबत काम करण्याची शिक्षा देण्यात येईल. तर दुसर्‍यांदा हाच गुन्हा करताना सापडल्यास तीन हजार रुपये दंड आणि तीन दिवस सामाजिक काम करणं बंधनकारक असणार आहे. तसंच तिसर्‍यांदा सापडल्यास पाच हजार रुपये दंड आणि पाच दिवस काम करावे लागणार आहेत. हा कायदा झाल्यास अशा प्रकारचा कायदा करणारे महाराष्ट्र पहिलं राज्य ठरले.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close