मुंबईच्या प्रेमाचा ऋणी, बिग बींचं मराठीत भाषण

June 17, 2015 12:49 PM0 commentsViews:

17 जून : “मला महाराष्ट्र आणि मुंबईने प्रेम दिलं,नाव दिलं, मान-सन्मान दिला. याबद्दल मी महाराष्ट्राचा खूप आभारी आहे आणि हा माझा सन्मान आहे” अस्सल मराठीत ही वाक्य आहे बॉलिवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन यांची…बॉलिवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्या भारदस्त आवाजात आणि तोही मराठीत ऐकण्याची संधी काल मंगळवारी मुंबईकरांना लाभली. साप्ताहिक विवेक च्या चित्रपट आणि संगित कोशाचं प्रकाशन अमिताभ बच्चन यांच्या हस्ते झालं. यावेळी पहिल्यांदाच अमिताभ यांनी पहिल्यांदाच आपलं संपूर्ण भाषण मराठीत केलं.

big b marathi speechसाप्ताहिक ‘विवेक’च्या चित्रपट आणि संगित कोशाचं प्रकाशनाचा कार्यक्रम विलेपार्ले भागात पार पडला. अमिताभ बच्चन यांच्या हस्ते पार पडलेल्या या प्रकाशन सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि खासदार पूनम महाजन या कार्यक्रमाल उपस्थित होते. यावेळी अमिताभ यांनी मराठीतून भाषण करून सर्वांची मनं जिंकली.

भाषणाच्या सुरूवातीलाच मी, आज मराठीतून भाषण करण्याचा प्रयत्न करतोय. मराठी बोलणं माझ्यासाठी शक्य नाही पण अशक्यही नाहीये. मराठी मला समजते, पण बोलण्याची सवय नाही. मला मुंबई आणि महाराष्ट्राबद्दल खूप प्रेम आहे. महाराष्ट्र-मुंबईने मला खूप प्रेम, नाव दिलं, मान सन्मान दिला आणि पत्नीही दिली, नातू, नातही दिली याबद्दल महाराष्ट्राचा मी खूप आभारी आहे आणि हा माझा मोठा सन्मान आहे अशी भावना अमिताभ यांनी व्यक्त केली.

पुढे ते आपल्या भाषणात म्हणतात, कोशाच्या प्रकाशनला मला बोलवण्यात आलं हा माझा मोठा बहुमान आहे. आपल्या देशात कोशाकडे लक्ष दिलं जात नाही. संशोधन, माहिती साठवली जात नाही. त्यामुळे पुर्वजानांचा अनोमल साठा वाया गेलाय अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

जमाना हा गुगल आणि व्हॉटसअपचा आहे. पण, आमच्या पिढीचं पुस्तकावर प्रेम आहे. गुलाबी कागदावर अत्तर शिंपडून प्रेम पत्र लिहण्यात जी मजा आहे. ती मजा व्हॉट्सअपच्या स्माईलीमध्ये येत नाही अशी फटकेबाजीही अमिताभ बच्चन यांनी केली. अमिताभ यांनी आपल्या भाषणाची सांगता शांता शेळके यांच्या काव्याने केली. कोट छत्तीसचा अभंग त्याला कधीन जाते तडे मराठी पाऊल पडते पुढे…मराठी पाऊल पडते पुढे असं म्हणताच प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडात सभागृह डोक्यावर घेतलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close