राज्य मंत्रिमंडळ होणार महाजम्बो, लवकरच 9 मंत्री घेणार शपथ ?

June 17, 2015 1:34 PM0 commentsViews:

cm mantralya 417 जून : राज्यमंत्रिमंडळ येत्या काही दिवसांत लवकरच महाजम्बो मंत्रिमंडळ बनणार आहे. कारण, मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळालाय. या महिन्याच्या अखेरीस आणखी 9 जणांचा राज्यमंत्रिमंडळात समावेश केला जाणार आहे.

यात भाजप- 5, शिवसेना- 2, आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय समाज पक्षाला प्रत्येकी 1 मंत्रिपद मिळेल.त्यामुळे आगामी काळात राज्यमंत्रिमंडळाची संख्या 39 झालेली असेल.

या मंत्रिमंडळ विस्तारासोबतच महामंडळाच्या वाटप वादही महायुती समन्वय समितीने निकाली काढलाय. महायुतीच्या नव्या फार्मुल्यानुसार नेमणुका होणार्‍या 33 महामंडळापैकी भाजपच्या वाट्याला 20, शिवसेना 8 आणि मित्रपक्ष 5 असं वाटप करण्यात आलंय.

विस्तार झाल्यानंतर राज्याचं मंत्रिमंडळाचा आकार वाढणार असला तरी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या काळात हीच संख्या 70 च्या घरात होती. तर आघाडीच्या काळात 42च्या आसपास स्थिरावली होती. सत्तावाटपाचा हाच फॉर्म्युला डोळ्या समोर ठेऊन महायुतीने 3 जागा हाताशी राखत विस्तारामध्येही ही संख्या 39 पर्यंतच मर्यादीत ठेवलीय.

महायुतीचं सत्ता वाटप
सध्याची मंत्रिमंडळ संख्या- 30
भाजप-20, शिवसेना-10

आणखी 9 मंत्र्यांचा शपथविधी होणार

असा होणार विस्तार
भाजप -5
सेना-2
स्वाभिमानी शेतकरी संघटना-1
राष्ट्रीय समाज पक्ष-1

विस्तारानंतर मंत्रिमंडळाची संख्या-39

महामंडळाचं वाटप (33)
भाजप -20
शिवसेना – 8
मित्रपक्ष – 5
एकूण-33

महामंडळ सदस्य (850)
भाजप – 500
शिवसेना – 200
मित्रपक्ष- 150

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close