पुण्यात पेट्रोल, डिझेल महागणार

November 13, 2009 12:49 PM0 commentsViews: 2

13 नोव्हेंबर जीवनावश्यक वस्तूंसोबतच पेट्रोल, डिझेलवरही 1 टक्का जास्त जकात वाढ करण्याचा प्रस्ताव पुणे महानगरपालिकेने ठेवला आहे. त्यामुळे आता महागाईत पेट्रोल, डिझेलचे दर वाढण्याची शक्यता आहे. पण पुणेकरांनी या जकात वाढीला तीव्र विरोध केला आहे. सध्या पुण्यात एक लीटर पेट्रोलसाठी 48 रुपये 10 पैसे मोजावे लागतात. या जकात वाढीमुळे पुणेकरांना जास्तीचे 50 पैसे मोजावे लागतील. यंदा महापालिकेने जकातीमधून पालिकेनं 914 कोटींच्या उत्पन्नाचं उद्दीष्ट ठेवलं आहे. मात्र सात महिन्यांच्या काळात पालिकेला आतापर्यंत 400 कोटी रुपये मिळालेत. त्यामुळे पुढील पाच महिन्यात उद्दीष्ट गाठणं अवघड असल्याचं प्रशासनाचं मत आहे. पण नियोजनशुन्य प्रशासनामुळे पालिकेवर ही स्थिती ओढवलीय असा आरोप करत भाजपनं या वाढीस तीव्र विरोध केला आहे.

close