उद्धव ठाकरेंच्या ‘बाऊंसर’वर पवारांचा ‘सिक्सर’, ‘माझा स्कोअर सर्वोत्तमच’!

June 17, 2015 3:30 PM0 commentsViews:

PAWAR X UDDHAV

17 जून : माझा स्कोअर हा मुंबई क्रिकेटच्या इतिहासातला एक सर्वोत्तम स्कोअर असून, माझं योगदान पाहता, माझा स्कोर एक नव्हे, तर किमान द्विशतकापेक्षाही जास्त असावा, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या ‘बाऊंसर’वर ‘सिक्सर’ लगावलाय.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एमसीएच्या मतदारांना ‘क्रिकेट फर्स्ट’ गटाला निवडून देण्याचं आवाहन केलं आहे. सचिन, गावस्कर रिटायर झाले, पण आपले अध्यक्ष काही रिटायर व्हायला तयार नाही, आणि त्यांची धावसंख्या शून्य आहे, अशा प्रकारचा टोला उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना लगावला होता. याला प्रत्युत्तर देताना, स्टेडियमवरील क्रिकेट सेंटर ही वास्तू, वांद्रे- कुर्ला संकुल इथली इनडोअर अकादमी, कांदिवलीचं सचिन तेंडुलकर जिमखाना या सर्व योगदानाकडे पाहिल्यास माझं नुसते शतक नव्हे, तर किमान द्विशतक झालं असावं, असं शरद पवार म्हणाले. तसंच उद्धव ठाकरेंचे वडील माझे मित्र होते. पण पुढच्या पिढीला मी गांभीर्याने घेत नाही, असं ही ते म्हणाले.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close