‘क्वीन’चा ‘कट्टी-बट्टी’

June 17, 2015 3:33 PM0 commentsViews:

आली आली…पुन्हा एकदा आली ही तनू…पुन्हा मन मोडायला…टाइमपास प्रेम करायला..आणि तिच्यासाठी बनलेला दिवाना आता होणार बेचारा…

कट्टीबट्टी कंगनाचा अजून एक सिनेमा..तिच्या सोबत सिनेमात आहे इमरान खान..आणि कंगनाला इंट्रोड्युस करायची अजून चांगली पद्धत ती कुठली असणार? कारण सिनेमात इमरान कंगनाच्या मागे मागेच फिरतोय. सिनेमातले डायलॉग्जचे पंचही कंगनाकडेच. आणि कंगनाच या सिनेमाची सरपंच वाटतेय. आणि कंगना फक्त या सिनेमाची हिरॉईन नाही. सिनेमाचा पहिला शॉटही कंगनानं घेतला. कंगनाचाच कंट्रोल सगळीकडे दिसत होता. म्हणूनच तिला मॅडम क्वीन म्हणतात.. कॅमेरा हातात घेते.. अभिनय करते. सिनेमात हिरोपेक्षा जास्त भाव खाऊनही जाते. फक्त सिनेमातच नाही, तर खर्‍याखुर्‍या आयुष्यातही कंगनानं बड्या सुपरस्टार्सच्या ऑफर्स अशाच उडवून लावल्या. सलमान सुल्तान बनला, पण त्याची बेगम होण्याचं कंगनानं नाकारलं. डेट्सचं तर एक कारण. खरं तर कंगनाला आपली शक्तीच दाखवायची होती.. आणि हे आम्ही नाही, अख्खी इंडस्ट्रीच म्हणतेय.

किती काम करतेय ही कंगना…सलमानला उडवून लावलं. आमिरशी टक्कर. शाहरूखशी बरोबरी… मग कंगनाला प्रेमाबिमासाठी वेळ कुठलाय? चला, चांगली बातमी आहे. कंगना इज रेडी फॉर लव्ह…आता रविवारी एवढं नटूनथटून मीडियाला भेटायला कंगना का आली ते तिनेच सांगितलं… असो आता कट्टी-बट्टीच्या निमित्ताने ‘क्वीन’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यासाठी आलीये…बघुया बॉक्सऑफिसवर क्वीनचा जलवा चालतो का ते…

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close