गोवा बाँम्बस्फोट : धनंजय आष्टेकरची इचलकरंजीत चौकशी

November 13, 2009 12:52 PM0 commentsViews: 2

13 नोव्हेंबर गोवा बाँम्बस्फोट प्रकरणी अटक केलेल्या धनंजय अष्टेकर या कॉलेजमधील तरुणाला तपासासाठी गुरुवारी रात्री इचलकरंजीत आणण्यात आलं होतं. गोव्यामध्ये घडलेल्या बॉम्बस्फोटातला बॉम्ब तयार करण्यासाठी धनंजयनं इचलकरंजीतल्या काही इलेक्ट्रॉनिक्स दुकानातलं साहित्य विकत घेतलं होतं. त्याचाच तपास करण्यासाठी गोवा पोलिसांनी त्याला इचलकरंजीत आणलं. इचलकरंजी पोलिसांच्या मदतीनं गोवा पोलिसांनी इलेक्ट्रानिक दुकानांवर छापे टाकले आणि काही साहित्य जप्त केलंय. मध्यरात्री अष्टेकर राहात असलेल्या घराचीही पोलिसांनी झडती घेतली. धनंजय अष्टेकर हा इचलकरंजीतल्या डी.के.टी.ई शिक्षण संस्थेत इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत आहे.

close