जॅकेट गहाळप्रकरणाची चौकशी करा – एकनाथ खडसे

November 13, 2009 12:54 PM0 commentsViews: 6

13 नोव्हेंबर शहीद हेमंत करकरेंच्या गहाळ झालेल्या बुलेटप्रूफ जॅकेटबद्दल सरकार बनवाबनवी करत आहे, असा थेट आरोप विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. या सगळ्या प्रकाराच्या चौकशीचीही मागणी त्यांनी केली आहे. 26/11च्या हल्यात हेमंत करकरे शहिद झाले होते. दोनच दिवसांपूर्वी हेमंत करकरेंच्या पत्नी कविता करकरे यांनी माहितीच्या अधिकाराखाली हेमंत करकरेंचं जॅकेट गहाळ झाल्याची माहीती उघड केली होती.

close