26/11तील जखमी अजूनही मदतीपासून वंचित

November 13, 2009 12:57 PM0 commentsViews: 1

13 नोव्हेंबर मुंबई हल्ल्यातील जखमी झालेल्या 433 जणांपैकी आतापर्यंत फक्त 118 जणांनाच पंतप्रधान कार्यालयातून मदतीचे चेक आले आहेत. उर्वरित लोकांना मदतीचे चेक आलेले नाहीत, अशी तक्रार करत त्यांना तातडीनं मदत मिळावी अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. सौमेया यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या नागरिकांनी आर. आर. पाटील यांची भेट घेतली. आर. आर. पाटील यांनी शुक्रवारीच गृहमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला आणि कामकाजाला सुरूवात केली.

close