एमसीएचे कॅप्टन शरद पवारच!

June 17, 2015 9:57 PM0 commentsViews:

sharsrqw;qwhnwjy

17 जून : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पिचवर शरद पवारांनी पुन्हा बाजी मारली आहे. शिवसेनेचा पाठिंबा असलेल्या क्रिकेट फर्स्टचा धुव्वा उडवत, शरद पवार पुन्हा अध्यक्ष झाले आहेत. त्यांना 172 मतं मिळाली आहेत. त्यांच्या पॅनलचे दिलीप वेंगसरकर आणि आशिष शेलार हे उपाध्यक्षीपदी निवडून आलेत.

शिवसेनेने विजय पाटील यांच्या क्रिकेट फर्स्टला पाठिंबा दिल्याने एमसीएच्या निवडणुकीला राजकीय रंग चढला होता. पवार-महाडदळकर गटासमोर डॉ. विजय पाटील यांनी कडवे आव्हान उभे केले होते. उद्धव ठाकरे यांनी विजय पाटील यांच्यासाठी बॅटिंग करत पत्रकार परिषद घेतली होती. त्यामुळे शरद पवार एमसीएचे अध्यक्षपद कायम ठेवण्यात यशस्वी होतात, का याविषयी उत्सुकता निर्माण झाली होती.

मतदानाला बुधवारी दुपारी 3 वाजता सुरुवात झाली. शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख आणि एमसीएचे सदस्य उद्धव ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे यांनी आधी मतदान केले. मुंबईच्या माझगाव क्रिकेट क्लबचे सदस्य आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही मतदानाचा अधिकार बजावला. काँग्रेस नेते नारायण राणे मात्र परदेशात असल्यामुळे मतदानाला उपस्थित राहू शकले नाहीत. एकूण 329 सदस्यांपैकी 321 जणांनी मतदान केले आहे. यात शरद पवार यांना 172 मतं मिळाली तर डॉ. विजय पाटील यांना 145 मतं मिळाली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close