भुजबळांचा एसीबीवर पलटवार, संपत्तीचे आकडे फुगवल्याचा आरोप

June 17, 2015 10:45 PM0 commentsViews:

CB Chafasfasmya

17 जून : एसीबीने माझी संपत्ती वाढवून चढवून दाखवल्याचा आरोप माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी केलाय. आयबीएन लोकमतला दिलेल्या मुलखातीत त्यांनी म्हटलंय की माझी प्रतिमा मलीन करून मला राजकारणातून उठवण्याचा हा डाव आहे.

नवी दिल्लीतल्या नव्या महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी एसीबीने छगन भुजबळ यांच्या मुंबई, नाशिक आणि पुण्यातल्या 17 ठिकणांवर मंगळवारी छापे टाकले. त्यानंतर बुधवारी वांद्र्यातील मुंबई एज्युकेशनल ट्रस्टच्या कार्यालयांवर छापा टाकला. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. अँटी करप्शन ब्यूरोने माझ्या संपत्तीचे आकडे फुगवून सांगितले आहेत. मला आणि माझ्या कुटुंबीयांना अनेक जागा वारसा हक्कानं मिळाल्या आहेत. तसंच अनेक वर्षांपूर्वी घेतलेल्या जागांच्या किंमत आज वाढल्या आहेत, अशी सारवासारव भुजबळांनी केली आहे.

राष्ट्रवादी पक्ष आणि शरद पवार यांनी मला एकाकी पाडलं नसून ते माझ्या पाठीशी आहेत, असा दावाही भुजबळांनी केला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close