ठाणे-वाशी ट्रान्सहार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प

June 18, 2015 8:49 AM0 commentsViews:

habour railway problem

18 जून : ठाणे- वाशी ट्रान्सहार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने आज (गुरूवारी) सकाळी कामावर निघालेल्या कार्यालयीन कर्मचार्‍यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने दिवसाच्या सुरवातीलाच मुंबईकरांचे अतोनात हाल होत आहेत.

वाशी, बेलापूर आणि पनवेलला जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी ठाण्याहून प्रवास करतात. मात्र वाहतूक ठप्प झाल्याने त्यांना कुर्ल्याहून हार्बर मार्गावर प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे आज चाकरमान्यांची चांगलीच दमछाक होणार आहे.

ठाणे आणि ऐरोली दरम्यान रेल्वेच्या दुरूस्ती वाहन घसरल्यामुळे वाहतूकीचा खोळंबा झाला आहे. काल रात्रीपासून याठिकाणी दुरूस्तीचे काम सुरू होतं. गेल्या तीन तासापासून ट्रान्सहार्बर मार्गपूर्ण पणे ठप्प असून वाहतूक पूर्ववत होण्यासाठी अजून काही वेळ लागण्याची शक्यता आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close