केरळ-राजस्थान पहिल्या 25 लोकप्रिय पर्यटन स्थळांमध्ये

November 13, 2009 12:59 PM0 commentsViews: 141

13 नोव्हेंबर नॅशनल जिऑग्राफिकने जगातील लोकप्रिय अशा 25 सर्वोत्तम पर्यटनस्थळांसाठी केलेल्या एका सर्वेक्षणात केरळ आणि राजस्थानचा समावेश झाला आहे. या स्पर्धेत केरळ आणि राजस्थानने ताजमहाललाही मागे टाकलं आहे. मनोरम सारख्या बॅकवॉटर्ससाठी प्रसिद्ध असलेलं केरळ या यादीत तेविसाव्या स्थानावर आहे, तर गुलाबी थंडीचं शहर राजस्थान एकोणिसाव्या स्थानावर आहे. ताजमहाल आणि आग्रा फोर्टला तिसावं स्थान मिळालंय. पर्यावरणाच्या दृष्टीनं आग्रा शहराची अधिक काळजी घेण्याची तातडीची गरज असल्याचं या सर्वेक्षणात नॅटजिओनं म्हटलं आहे. पहिल्या स्थानावर असणार्‍या नॉर्वेला जगातील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटनस्थळाचा मान मिळाला आहे. जगातील एकूण 133 पर्यटनस्थळांमधून हे सर्वेक्षण करण्यात आलं.

close