महाडमध्ये विषारी वायू गळतीमुळे 4 कामगारांचा मृत्यू

June 18, 2015 10:46 AM0 commentsViews:

mahaasd
18 जून : रायगड जिल्ह्यातील महाड औद्योगिक वसाहतीमध्ये बुधवारी रात्री दहाच्या सुमारास विषारी वायू गळती झाली. त्यामुळे चार कामगारांचा मृत्यू झाला.

औद्योगिक वसाहतीमध्ये शकील नावाच्या व्यावसायिकाचे भंगार मालाचे गोदाम आहे. याच गोदामात रात्री केमिकलचे ड्रम उतरविण्यात येत होते. त्यावेळी अचानक वायू गळती झाली. त्यात चार कामगारांचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला. वायू गळतीमुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

दरम्यान, भंगार गोदामात उतरविण्यात येणारे केमिकलचे ड्रम कोठून आणण्यात आले, याचा तपास पोलीस करीत आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close