औरंगाबादमध्ये विषारी रसायनामुळे शेती नापीक

June 18, 2015 9:28 AM0 commentsViews:

17 जून : औरंगाबाद शहराजवळ असलेल्या शेंद्रा औद्योगिक वसाहतीमधील केमिकल कंपनीने शेतकर्‍यांच्या शेतात घातक रसायने सोडल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या कंपनीच्या केमिकलमुळे शेंद्रामधल्या आत्माराम ठुबे यांची शेती नापीक झाली आहे. यामुळे शेतीत पेरलेला माती प्रदुषित झालीय. त्यात आता एकही दान उगवत नसल्यामुळे शेतकर्‍यांच्या डोळ्यात अश्रू आलेत. आत्माराम यांना हाच हंगाम नाही तर येणार्‍या पाच वर्षांचा हंगाम जमिण पडिक ठेवावी लागेल, हे रसायन इतक घातक आहे, की त्यांच्या शेतातील झाडंही जळून गेली आहे.

दरम्यान, या शेतांमध्ये केमिकल रेडिको डिस्टिलरीज कंपनीने सोडल्याचा आरोप गावातील शेतकर्‍यांनी केला आहे. यात विशेषबाब म्हणजे या कंपनीमध्ये भाजपच्या एका बड्यानेत्याची गुंतवणूक असल्याचही समोर आलं आहे. केमिकल मुळे परिसरातील शेती अडचणीत सापडली आहे. या आत्माराम यांनी प्रदूषक महामंडळात तक्रारही केल्या. पोलीस ठाणे गाठले पण भाजपच्या बड्या नेत्याचं नाव यात असल्यामुळे कंपनीवर न पोलिसांनी कारवाई केली न प्रदूषण महामंडळाने.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close