बेंटेक्स समजून कवडीमोल भावात विकले सोन्याचे दागिने!

June 18, 2015 11:33 AM0 commentsViews:

18 जून : ‘देव आला द्यायला आणि पदर नाही घ्यायला’, अशी मराठीमध्ये म्हण आहे. तसाच काहीसा प्रकार यवतमाळपासून 75 किलोमीटर असलेल्या गांधीनगर गावात राहणार्‍या शेतमजुरासोबत घडला.

उदय किसन चव्हाण असं त्या शेतमजुराचे नाव आहे. या शेतमजूराला कामावरून घरी येत असताना रस्त्याच्या कडेला एका पांढर्‍या पिशवीत सोन्यासारखे दिसणारे दागिने सापडले. या पिशवीत सुमारे 350 नग दागिने होते. त्याने ते घरात ठेवून घेतले. त्यानंतर मात्र हे दागिने बेन्टेक्सचे असतील, असं समजून त्याने या दागिन्यांची गावातल्या नागरिकांना 50 – 100 रुपयांत विकले. यातले काही दागिने दिग्रस शहरातल्या एका स्टेशनरीच्या दुकानातही विकायला गेले. दुकान मालकाला दागिन्यांबाबत संशय आला, त्यानं तपासणी केली असतांना हे दागिने चक्क सोन्याचे असल्याच त्याचं लक्षात आले. स्टेशनरी चालकानं विकलेले ते दागिने परत घेण्यास सुरुवात केली आणि इथेच या दागिन्यांचं बिंग फुटल.

तोपर्यंत दुसरीकडे गावात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली होती. या घटनेची माहिती पोलीस पाटलापर्यंत बातमी पोहोचली. 20 रुपयात विकत घेतलेले दागिने खरे़खुरे असल्याचं गरीब गावकर्‍यांच्या लक्षात आलं. त्यांच्या चेहर्‍यावर आंनद फुलला पण क्षणभरासाठीच. कारण तोपर्यंत पोलिसांनी हे दागिने जप्त करण्याची मोहीम सुरु केली होती. या सर्व प्रकरणावर ‘समय से पहिले ओर नसीब से ज्यादा कूच नही मिलता’ हे म्हणावं लागेल.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close