मुंबईसह, कोकणात मुसळधार पावसाचा इशारा

June 18, 2015 2:19 PM0 commentsViews:

VBK-MR7_767976g

18 जून : येत्या 48 तासांत मुंबई – कोकण परिसरात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. कोकणासह, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागातही जोरदार पावसाची शक्यताही हवामान खात्यानं वर्तवली आहे.

मुंबईसह पश्चिम उपनगरात पावसाचा जोर कायम आहे. पण त्यामुळे वेस्टर्न एस्क्प्रेस हाय वेवर वहातूकीची कोंडी झाली आहे. तसंच सकाळच्या पावसामुळे परळ, हिंदमाता, दादर यासारख्या भागाांमध्ये पाणी साचल्याने वाहतूक मंदावली होती.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close