लातूर कोर्टात महिलेने घेतले पेटवून

June 18, 2015 3:08 PM0 commentsViews:

Latur court

18 जून :  लातूर सत्र न्यायालयाच्या इमारतीमध्ये एका महिलेने आज अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला.या घटनेत ही महिला 70 टक्के जळाली असून, ती सध्या शासकीय रूग्णाल्मृत्युंशी झुंज देत आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

राहीबाई सुरवसे असं आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या महिलेचं नाव असून ती धनेगाव इथली रहिवासी आहे. या महिलेचं जमिनीचं प्रकरण 15 वर्षापासून न्यायालयात सुरू आहे. वडीलोपार्जीत जमिनीचा वाद होता. तालुका कोर्टाने दोनवेळा या महिलेच्या विरोधात निकाल दिला होता. शेवटी जिल्हा न्यायालयात या महिलेनं अपील केलं होत. या सर्व प्रकारामुळे ती अस्वस्थ होती. आज कुठलीही तारीख नसतांना ती न्यायालयात आली आणि इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतलं. त्यात त्या गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close