पवारांकडून भुजबळांची पाठराखण, आम्हाला जेलमध्ये टाकण्याची वाट पाहतोय !

June 18, 2015 4:33 PM1 commentViews:

bhujbal on pawar318 जून : राष्ट्रवादीचे प्रमुख नेते छगन भुजबळ यांच्याभोवती एसीबीने फास आवळल्यामुळे खुद्ध राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आता भुजबळांसाठी मैदानात उतरले आहे. मी आणि माझे सहकारी, हे सरकार आम्हाला कधी जेलमध्ये टाकतंय याची वाट बघतोय इतक्या कठोरपणे शरद पवारांनी भाजप सरकारला फटकारलं.

छगन भुजबळांच्या विरोधातल्या प्रकरणांचे निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीनं घेतले आहेत. याचा अर्थ ही राज्य मंत्रिमंडळाची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे छगन भुजबळ एकटे जबाबदार कसे, असा प्रतिप्रश्न राज्य सरकारला करत शरद पवार यांनी छगन भुजबळांची भक्कमपणे पाठराखण केली.

याशिवाय एसीबीचे चौकशी अधिकारी मीडियासमोर चौकशीचा तपशील जाणीवपूर्वक उघड करत आहेत. त्यामुळे भुजबळ आणि आमच्या पक्षाविषयी जनमानसात संभ्रम निर्माण होतोय. याला सुडबुद्धीनं केलेली किंवा हेतूपुस्सर केलेली कारवाई म्हणायचे नाहीतर काय म्हणायचं असा खडासवालही शरद पवारांनी उपस्थित केला.

भुजबळ पवारांच्या भेटीला

तत्पुर्वी छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतली. एसीबीच्या कारवाईनंतर पहिल्यांदाच भुजबळांनी पवारांचीही भेट होती. या भेटीत तब्बल 20 मिनिटं दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. पक्षाची साथ मोलाची असल्याने पक्ष भक्कमपणे आपल्या बाजूने उभा रहावा, यासाठी भुजबळांचे हे प्रयत्न सुरू समजतंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • dd

    amhipan vat pahtoy , kadhi jatay te

close