दुंभगलेलं घर उभं राहणं कठिण -सरसंघचालक

November 14, 2009 10:17 AM0 commentsViews: 5

14 नोव्हेंबर जे घर दुभंगलेलं आहे ते उभं राहु शकत नाही अशा वेळी आपण आपल्या मुळाकडे पहायला हवं असे सूचक उद्गार सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुण्यात काढले. लहुजी वस्ताद यांच्या 115 व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमासाठी पुण्यात ते आले होते. सरसंघचालकांनी यावेळी महात्मा फुले यांच्या वाड्याला भेट देऊन त्यांना अभिवादन केलं. सामाजिक समरसता मंचानं या कार्यक्रमाचंं आयोजन केलं होतं. सरसंघचालकांनी केलेलं विधान सध्याच्या परिस्थितीतल्या भाजपलाही लागू पडत असल्यानं, हा भाजपला टोमणा तर नाही ना अशीच चर्चा या कार्यक्रमस्थळी रंगली होती.

close