मुंबईत अतिवृष्टीचा इशारा

June 19, 2015 10:51 AM0 commentsViews:

mumbai rain 343419 जून : मुंबईकरांना आज पुन्हा एकदा 26 जुलैच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. मुंबईत शुक्रवारी मध्यरात्रीपासून धो धो पाऊस सुरू आहे. येत्या 24 तासांत मुंबईत अतिवृष्टी आणि मुसळधार पावसाचा इशारा मुंबई वेधशाळेनं दिलाय. दुपारी 2 वाजून 20 मिनिटांनी 4.47 उंच भरती येणार आहे.

मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. ठिकठिकाणी पाणी साचलंय. सायन, विद्याविहार, कुर्ला, चेंबुर, कल्याण, डोंबिवली भागात पाणी साचल्यामुळे मध्ये रेल्वे ठप्प झालीये. रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वेची सीएसटी ते कल्याण वाहतूक ठप्प झालीये.

तर पश्चिम मार्गावर अंधेरी ते चर्चगेट वाहतूक ठप्प झालीये. मुसळधार पाऊस सुरूच असून ठिकठिकाणी पाणी साचलंय. ठाण्यात शाळा बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेनं घेतला. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन मुंबई पालिका आयुक्तांनी केलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close