प्रदेशाध्यक्षपदासाठी भाजपचा तरुण नेत्याचा शोध

November 14, 2009 10:20 AM0 commentsViews: 2

14 नोव्हंबरपक्षात राष्ट्रीय पातळीबरोबर राज्यस्तरावरही व्यापक बदल करण्याची तयारी भाजपने सुरु केली आहे. महाराष्ट्रात प्रदेश भाजपमध्येही तरुण चेहर्‍याला संधी मिळण्याची शक्यता आहे. गडकरी दिल्लीत गेले तर, त्यांच्या जागी सध्या काही तरुण नेत्यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. यामध्ये आमदार विनोद तावडे, देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, प्रकाश शेंडगे यांच्या नावाची चर्चा आहे.

close