मुंबई : पावसामुळे रेल्वेची दैना, लांबपल्ल्याच्या गाड्याही रद्द

June 19, 2015 2:05 PM0 commentsViews:

mumbai train cans19 जून : मुंबईत मुसळधार पावसाचा रेल्वे सेवेला फटका बसलाय. तिन्ही मार्गावरील लोकल सेवा तर ठप्पच आहेच मात्र, लांबपल्ल्याच्या गाड्यांनाही बसलाय. मुंबईत येणार्‍या आणि मुंबईतून जाणार्‍या आज आणि उद्याच्या काही रेल्वे एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबईत येणार्‍या प्रवाशांचे हाल झाले.

आज (शुक्रवारी) मुंबईत येणार्‍या मुंबई ते पुणे नियमित धावणारी मुंबई-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस रद्द करण्यात आलीये. पुणे-सोलापूर इंटरसिटी,सोलापूर-पुणे इंटरसिटी, पुणे-मुंबई इंद्रायणी, दादर मडगाव जनशताब्दी, मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेस आणि मुंबई-भुसावळ पॅसेंजर रद्द करण्यात आल्या आहेत.

तर उद्या 20 जून रोजी मडगाव-दादर जनशताब्दी एक्स्प्रेस,नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेस आणि भुसावळ-मुंबई पॅसेंजर रद्द करण्यात आलीये.

आज या लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द

मुंबई-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस
पुणे-सोलापूर इंटरसिटी
सोलापूर-पुणे इंटरसिटी
पुणे-मुंबई इंद्रायणी
दादर-मडगाव जनशताब्दी
मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेस
मुंबई-भुसावळ पॅसेंजर

उद्या 20 जून रोजी या गाड्या रद्द
मडगाव-दादर जनशताब्दी एक्स्प्रेस
नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेस
भुसावळ-मुंबई पॅसेंजर

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close