स्टेट बँकेच्या परीक्षेचे फॉर्म्स फक्त मराठी मुलांना द्या – मनसे

November 14, 2009 10:24 AM0 commentsViews: 102

14 नोव्हेंबररविवारी होणार्‍या एसबीआय भरतीच्या परीक्षांसाठी डोमिसाईल सर्टिफिकेट असणं बंधनकारक करावं. तसंच 10वीत ज्यांनी मराठीचा पेपर सोडवला असेल, अशा मुलांनाचं भरतीच्या परीक्षांमध्ये बसू द्यावं अशी मागणी मनसेने स्टेट बँकेला केली आहे. या भरतीमध्ये 80 टक्के स्थानिक तरुणांची भरती झाली पाहिजे असं मनसेनं सांगितलं आहे. महाराष्ट्रात एकूण 1100 जणांची भरती होणार आहे. यासाठी तीन लाख तरुण उमेदवार परीक्षा देणार आहेत. देशात एकाच दिवशी ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेला बसलेल्या मुलांना मराठी येणं बंधनकारक असल्याचं स्टेट बँकेनं म्हटलं आहे. या प्रश्नावर आंदोलन करत मनसेने एसबीआय अधिकार्‍यांची भेटही घेतली.

close