सीएसटी स्टेशनमध्ये पुन्हा लोकलचे डबे घसरले

November 14, 2009 11:42 AM0 commentsViews: 1

13 नोव्हेंबर सीएसटी स्टेशनमध्ये शुक्रवारी सकाळी पुन्हा लोकलचे दोन डबे रूळावरून घसरले. प्लॅटफार्म नंबर 6 वर हे डबे घसरले. हि गाडी कसार्‍याहून सीएसटीला येत होती. मात्र सुदैवानं यात कुणीही जखमी झालं नाही, पण या घटनेमुळे मध्य रेल्वेच्या लोकल 10 ते 15 मिनिटं उशिरानं धावत आहेत. कल्याण ते सीएसटी मेलमधून प्रवास करण्याची मुभा रेल्वेनं दिली आहे. दादर ते चर्चगेट मध्य रेल्वेच्या तिकीट किंवा पासवर प्रवास करण्याची मुभाही रेल्वेनं दिली आहे. दोनच दिवसांपूर्वी याच ठीकाणी रेल्वेचे डबे घसरले होते.

close