मुंबई तुंबलीये त्याला एकटी पालिका जबाबदार नाही -उद्धव ठाकरे

June 19, 2015 9:33 PM1 commentViews:

Uddhav tahcak19 जून : मुंबईत पावसाच्या पाण्यामुळे तुंबलीये त्याला एकटी महापालिका जबाबदार नाही. सर्व यंत्रणांचा समन्वय असला पाहिजे अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. तसंच मिठी नदीची धोक्याची पातळी वाढतेय, तिथल्या नागरिकांनी पालिकेला सहकार्य करावं अशी विनंतीही उद्धव यांनी केली.

यंदा पावसाळ्यात मुंबईत पाणी तुंबणार नाही मुंबई पालिकेनं केलेला दावा आज साफ वाहून गेलाय. खुद्द उद्धव ठाकरेंनी स्वत: नालेसफाईचा आढावा घेतला होता. मात्र, आज पहिल्याच पावसाने पालिकेचं पितळं उघडं पाडलंय.

मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे मुंबई आज दिवसभर ठप्प होती. अजूनही मुंबईत धो-धो पाऊस सुरूच असून मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प आहे. अनेक भागात पाणी साचलेलं आहे. उद्धव ठाकरे यांनी दुपारी मुंबई पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाला भेट दिली.

यावेळी मीडिया बोलताना उद्धव म्हणाले, मुंबईत पाणी तुंबलंय त्याला एकटी महापालिका जबाबदार नाही. सर्व यंत्रणांचं एकमेकांशी समन्वय असणं आवश्यक आहे. सगळ्यांचं सहकार्य मिळालं तर मुंबईला चांगले दिवस येतील असं उद्धव म्हणाले. मिठी नदीने 2.4 मिटर पातळी गाठलीये. पुढील अनर्थ टाळण्यासाठी मिठी नदी शेजारी नागरिकांनी सहकार्य करावं अशी विनंती उद्धव यांनी केलीये.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • झक मारली, अन भाजप ला मत दिले!

    1)अकलेच्या दुष्काळात बुडालेल्या मुंबईची गोष्ट –

    2)बाळासाहेबांच्या शब्दाला पावसाने दिलेला उजाळा?

    हे दोन्ही लेख ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी लिहिले आहे ते वाचावे
    जागता पहारा (jagatapahara(डॉट)blogspot(डॉट)in)

close