मुंबईत पावसामुळे झाड कोसळून एकाचा मृत्यू

June 20, 2015 6:18 PM0 commentsViews:

mumbai rain 18 june 2015 photos (5)20 जून :  शुक्रवारी दिवसभर मुंबईला झोडपल्यानंतर आज शनिवारी सकाळपासून पावसानं काहीशी उसंत घेतली. मात्र, संध्याकाळनंतर पावसाने पुन्हा जोर धरला. मुंबईत सांताक्रुझ इथल्या लिबर्टी हॉटेलसमोर उभ्या असलेल्या रिक्षावर झाड कोसळलं, त्यात मंजे मंडल यांचा मृत्यू झाला. मुंबई एकूण 54 ठिकाणी झाडं कोसळली आहेत.

कालच्या तुलनेत आज पाऊस कमी झाला. तरीही काल कोलमडलेलं लोकलचं वेळापत्रक काही सुरळीत झाल नाही. तिन्ही मार्गांवरची रेल्वे सेवा सुरू असली तरी मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावरची वाहतूक अर्धातास उशिरानं सुरू राहिल्या. आज सकाळी 8 ते सायं. 5 वाजेपर्यंत मुंबई शहरात 32.49 मिमी पावसाची, पूर्व उपनगरांत 23.80 मिमी तर पश्चिम उपनगरांत 21.48मिमी पावसाची नोंद झाली

– मुंबईत पावसामुळे झाड कोसळून एकाचा मृत्यू झालाय. सांताक्रुज इथल्या लिबर्टी हॉटेलसमोर उभ्या असलेल्या रिक्षावर झाड कोसळलं, त्यात मंजे मंडल यांचा मृत्यू झाला.

– आजही मुंबईत संततधार सुरूच असल्यानं अनेक भागात पाणी साचलं. परळमधल्या काही भागात गुडघाभर पाणी साचलंय. त्यामुळे
गाड्यांनाही मार्ग काढताना कसरत करावी लागली. या परिसरात केईएम, टाटा, वाडिया हे दवाखाने आहेत. त्यामुळे या दवाखान्यांमध्ये जाणार्‍या रुग्णांचा याचा त्रास होतोय.

– तर, संततधार पावसानं परेलच्या एलफिन्स्टन पुलाजवळ पाणी साचलंय. त्यामुळे तिथल्या दुकानांमध्ये पाणी गेल्यानं व्यापार्‍यांचं मोठं नुसान झालाय.

– एकीकडे कालपासून पडणार्‍या पावसाने मुंबईकर त्रासले असताना दुसरीकडे मात्र तरूणाई समुद्र किनार्‍यांवर आनंद लुटताना दिसतेय. नरिमन पॉईंटवर पावसाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी तरूणाईने उड्या टाकल्या आहे.

– अनेक भागातल्या पाण्याचा निचरा झाला असला तरी काही भागात अजूनही पाणी तुंबलंय. दरम्यान, आजसुद्धा मुंबईतल्या शाळा आणि कॉलेज बंद होत्या.. गरज असेल तरच घराबाहेर पडा आणि समुद्रकिनार्‍यावर जाण्याचं टाळा, असं आवाहन महापालिकेनं केलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close