करकरेंच्या गहाळ जॅकेटची चौकशी करणार – मुख्यमंत्री

November 14, 2009 12:27 PM0 commentsViews: 6

14 नोव्हेंबर मुंबई हल्ल्यात शहीद पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्या गहाळ जॅकेट प्रकरणी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दखल घेतली आहे. या प्रकरणात लक्ष घालण्याचं आश्वासन त्यांनी शहीद हेमंत करकरे यांच्या कुटुंबीयांना दिलं आहे. तसंच जॅकेट गहाळ झाल्याची चौकशी केली जाईल, असंही त्यांनी म्हटलं आहे. करकरे यांनी मुंबई हल्ल्यात घातलेलं जॅकेट त्यांना वाचवण्यासाठी उपयोगी ठरलं नव्हतं, हे त्यांच्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून स्पष्ट झालंय. बुलेटप्रूफ जॅकेट छेदून आठ गोळ्या करकरे यांच्या शरीरात घुसल्या होत्या.

close