चांद्रयान मोहिमेला एक वर्ष पूर्ण

November 14, 2009 12:56 PM0 commentsViews: 126

14 नोव्हंबर भारताच्या चांद्रयान मोहिमेला शनिवारी एक वर्ष पूर्ण झालं. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची ही सर्वात मोठी यशस्वी मोहिम होती. त्यामुळे जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. भारत सुपर पॉवर म्हणून जगापुढे आला. 14 नोव्हेंबर 2008ला रात्री सात वाजून पस्तीस मिनिटांनी चंद्रावर भारतीय तिरंगा फडकावला होता. चंद्रावर राष्ट्रध्वज पाठवणारा भारत जगामध्ये चौथा देश ठरलाय. चांद्रयान-1चे प्रोजेक्ट डायरेक्टर एम. अण्णादुरई आणि त्यांच्या टीमनेच चांद्रयान-1 ही मोहिम कमी खर्चातही यशस्वी करुन दाखवली. भारताच्या चांद्रयान-1 मोहिमेचं सर्वात मोठं यश म्हणजे चंद्रावर शोधलेलं पाणी. चांद्रयान- 1 ने चंद्राच्या दक्षिण धृवावर, पाण्याची रासायनिक मुलद्रव्यं शोधुन काढली. भारतीय शास्त्रज्ञांनी चांद्रयान-1 या मोहिमेत आखलेली सर्व कामं पूर्ण करण्यात यश मिळवलं. त्यामुळे आता भारताने चांद्रयान-2ची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार 2012 साली भारत चंद्रावर लुनार रोव्हर नावाची गाडी उतरवणार आहे. या गाडीमध्ये असणार्‍या रोबोच्या सहाय्याने चांद्रयान थ्रीसाठी फ्लॅटफॉर्म तयार करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. भारताची चांद्रयान थ्री मोहिम 2015 साली होणार आहे.

close