मृतदेह ताब्यात घेण्यावरून गुहागरमध्ये तणाव

November 14, 2009 1:00 PM0 commentsViews: 1

14 नोव्हेंबर फियान चक्रीवादळात सापडलेल्या मच्छिमाराचा मृतदेह ताब्यात घेण्यावरून गुहागरमध्ये वाद सुरू झाला आहे. शुक्रवारी रात्री एका मच्छिमाराचा मृतदेह सापडला. पण त्याची ओळख पटलेली नाही. बुरोंडी आणि कारूळ या दोन गावातल्या मच्छिमारांनी या मृतदेहावर हक्क सांगितल्यामुळे तणाव निर्माण झाला आहे. 24 तासांपासून या मृतदेहाचं पोस्टमॉर्टेमही झालेलं नाही. चक्रीवादळानंतर प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांकडून संतप्त भावना व्यक्त होत आहेत.

close