आर.आर. पाटलांकडुन गडचिरोलीच्या नक्षल परिस्थितीचा आढवा

November 14, 2009 1:03 PM0 commentsViews: 1

14 नोव्हेंबर गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी शनिवारी गडचिरोलीला भेट देऊन नक्षल्यांविरूध्दच्या कारवाईचा आढावा घेतला. गृहमंत्रालायचा पदभार स्विकारल्यानंतर त्यांची ही पहिलीच गडचिरोली भेट होती. जिल्ह्यातले वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि नक्षलविरोधी पथकातल्या अधिकार्‍यांशी चर्चा करुन त्यांनी जिल्ह्यातल्या स्थितीची माहिती घेतली. गेल्या काही महिन्यांपासून नक्षल्यांच्या कारवाया वाढल्याने या भेटीला विषेश महत्व आहे. निवडणुकींच्या काळात नक्षलवाद्यंानी केलेल्या हल्यात 18 पोलीस शहीद झाले होते.

close