बोली लावा आणि जिंका सचिनची सही असलेला टी-शर्ट

November 15, 2009 9:03 AM0 commentsViews: 3

15 नोव्हेंबरसचिनच्या गौरवशाली आंतरराष्ट्रीय क्रिकेट करियरला 20 वर्षं पूर्ण होतायत. सचिनची ही गौरवास्पद कामगिरी आयबीएन लोकमतवर आम्ही साजरी करतोय सचिन द ग्रेट या आमच्या स्पेशल कार्यक्रमात. फक्त आयबीएन लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत सचिननं आपली 44 वी वन डे सेंच्युरी झळकावताना घातलेला टी शर्ट आपली सही करुन आयबीएन लोकमतला दिलाय. या टी शर्टचा लिलाव आयबीएन लोकमतच्या माध्यमातून करण्यात येणार आहे आणि हा निधी अपनालय या समाजसेवी संस्थेला देण्यात येईल.मास्टर ब्लास्टर सचिनच्या टी-शर्टच्या या लिलावात तुम्हीही बोली लावू शकता. यासाठी आम्हाला एसएमएस करा SAC आणि पाठवा 51818 या नंबरवर. लिलावाची बोली 25 हजार रुपयांपासून सुरु होईल. रविवारी पहिल्याच दिवशी अविनाश भोसले ग्रुपचे सीईओ सुधांशू पुरोहित यांनी 25 हजार रुपयांची पहिली बोली लावली.

close