कोकणातील 118 मच्छीमार अजूनही बेपत्ता

November 16, 2009 11:31 AM0 commentsViews: 2

16 नोव्हेंबर फियान वादळात रत्नागिरी परिसरातील 97 आणि सिंधुदुर्ग परिसरातील 21 मच्छिमार बेपत्ता आहेत. त्यामुळे कोस्ट गार्डच्या हलगर्जीपणाला गावकरी चांगलेच संतापले आहेत. चक्रीवादळात बेपत्ता झालेल्या देवगडमधल्या 19 मच्छीमारांपैकी 3 मच्छीमार सुरक्षितपणे दापोली जवळच्या हर्णे बंदरात परतले. त्यांना 3 दिवस समुद्राशी झुंज द्यावी लागली. बेपत्ता मच्छीमारांचा शोध घेणार्‍या हेलिकॉप्टर्सना त्यांनी इशारेही केले होते, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. खोल समुद्रात बोटीचं इंजिन बंद पडल्याने त्यांची दिशाभूल झाली होती. शेवटी किनारा शोधत निघालेल्या या मच्छीमारांना हर्णेतल्या एका मच्छीमार बोटीने मदत केली. पण अजूनही बेपत्ता असलेल्या मच्छीमारांचा शोध घेतला जात नसल्याने गावकरी सरकारवर संतापले आहेत.

close