फियान ग्रस्तांना पाच लाखाची मदत द्या – एकनाथ खडसे

November 16, 2009 11:33 AM0 commentsViews: 9

16 नोव्हेंबरकोकणातल्या फियान वादळात मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना पाच लाख रुपयांची मदत करा, नाहीतर हिवाळी अधिवेशनात कामकाज चालू देणार नाही. असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी दिला आहे. सरकारी नियम बाजूला सारून फियानग्रस्तांना सरकारने मदत करावी अशी मागणी खडसे यांनी केली आहे. फियानग्रस्तांना न्याय मिळण्यासाठी प्रसंगी सभागृहही बंद पाडू असा इशारा त्यांनी दिला आहे. फियानग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर रत्नागिरीत ते बोलत होते. फियान वादळात मृत्यूमुखी पडलेल्यांना सरकारने तातडीची मदत म्हणून एक लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.

close