सरकारी कर्मचार्‍यांच्या कापड खरेदीत 50 कोटींचा गैरव्यवहार

November 16, 2009 12:17 PM0 commentsViews: 3

16 नोव्हेंबर पोलीस, एसटी महामंडळ आणि इतर सरकारी खात्यांच्या कर्मचार्‍यांना पुरवण्यात येणार्‍या ड्रेसच्या कापड खरेदीत गेल्या 5 वर्षात 50 कोटींहून अधिक रकमेचा गैरव्यवहार झाल्याचं उघड झालं आहे. एन. सी. राठोड या जागरूक नागरिकाने माहितीच्या अधिकाराखाली हा घोटाळा उघडकीस आणला आहे. एस. टी. महामंडळ,पोलीस, वनविभाग, आदिवासी विभाग आणि इतर सरकारी कार्यालयातल्या चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांसाठी यंत्रमाग महामंडळाकडून ड्रेस खरेदी करण्यात येतात. या खरेदीतच हा घोटाळा झाला. यंत्रमाग महामंडळावर वस्त्रोद्योग खात्याचं नियंत्रण आहे. पोलीस आणि एस. टी. महामंडळ दरवर्षी प्रत्येकी 10 कोटींची ड्रेस खरेदी करतात. आदिवासी विभाग दरवर्षी 7 कोटींचे ड्रेस खरेदी करतो. तर इतर विभाग दरवर्षी 5 ते 7 कोटींचे ड्रेस खरेदी करतात. या ड्रेसखरेदीतच गेल्या वर्षात 50 कोटींहून अधिक रकमेचा गैरव्यवहार झाला आहे.

close