26/11 : कहाणी देवकीच्या लढ्याची

November 16, 2009 12:20 PM0 commentsViews: 2

16 नोव्हेंबर 26/11 च्या हल्ल्यात अनेक साक्षीदार आहेत. ह्या साक्षीदारांमध्ये एक साक्षीदार अशीही आहे जिची साक्ष कोर्टानं ऐकली तर खरं पण नोंद मात्र करुन घेतली नाही. कारण ती साक्षीदार अज्ञान आहे. बांद्र्याला राहणार्‍या आणि सीएसटी स्टेशनवर दहशतवादी हल्ल्यात अपंग झालेल्या देवकीची ही कहाणी. 26/11 च्या हल्याला एक वर्ष होऊनही त्या आठवणी 10 वर्षाच्या देवकीला अस्वस्थ करतात. 26/11 ची ती रात्र देवकी कधीही विसरु शकणार नाही असा घाव अतिरेक्यांनी तिच्यावर केला. मोठ्या भावाला भेटण्यासाठी देवकी, तिचे वडील आणि भावासह पुण्याला निघाली होती. गाडीची वाट पाहत असतानाच अचानक गोळीबाराचा आवाज आला. देवकीच्या पायात गोळी लागली होती. तीला खुप त्रास झाला होता. नंतर ती बेशुध्द झाली त्यानंतर काय झालं ते तीला आठवत नाही. हल्याच्या वेळी नऊ वर्षाची असणार्‍या देवकीने कसाबला फक्त 20 फुटावरुन बघितलं होतं. कोर्टात साक्ष देण्यासाठी आलेल्या देवकीनं कसाबला लगेच ओळखलं. देवकीच्या पायाला गोळी लागल्यानंतर तीनवेळा तिचं ऑपरेशन करण्यात आलं. पण तरीही पाय बरा झालेला नाही, देवकीनं धैर्यानं या संकटाला तोंड दिलं असलं तरीही, अपंगत्वाची सल तिच्या मनात आहेच. आधीच आईचं छत्र गमावलेल्या देवकीला या हल्ल्याने जास्तच उध्वस्त केलं, पण आता तिने लढण्याचा केलेल्या निर्धारामुळे मुंबईकरांचं हेच स्पिरीट अशा हल्ल्यांनी मुंबई थांबणार नाही हे सिद्ध करतं. कसाब सारख्या दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी छोट्या देवकीला पोलीस व्हायचंय.

close