राकेश मारियांनीही ललित मोदींची घेतली होती भेट

June 21, 2015 3:51 PM0 commentsViews:

rakesh maria-lalit modi21 जून : ललित मोदी आणि भाजपच्या नेत्या सुषमा स्वराज यांच्या प्रकरणामुळे वादंग उठलंय. या वादात आता मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांचं ही नाव पुढे आलंय. ललित मोदी आणि मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया यांची लंडनमध्ये भेट झाल्याची माहिती समोर आलीय. याभेटीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राकेश मारियांकडे स्पष्टीकरण मागितलंय. ललित मोदी आणि राकेश मारिया यांची लंडनमध्ये 2014 ला भेट झाली होती. मारिया 2014 मध्ये एका परिषदेसाठी लंडनला गेले होते त्यावेळी ही भेट झाली होती.

दरम्यान, राकेश मारिया यांनी ललित मोदींसोबतच्या भेट प्रकरणावर खुलासा केलाय. लंडन असताना ललित मोदींच्या वकिलांनी त्यांना भेटण्याची विनंती केली होती, त्यांच्या जीवाला धोका असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळं ललित यांना भेटल्याचं मारिया यांनी स्पष्ट केलं.

15 ते 20 मिनिटांची ती भेट होती, त्या भेटीत आपल्या आणि आपल्या पत्नीच्या जीवाला धोका असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यावेळी त्यांनी मुंबईत येवून तक्रार दाखल करावी असं मोदींना सांगितल्याचं मारिया यांनी स्पष्ट केलं. भारतात परतल्यानंतर त्या भेटीसंदर्भातला गुप्त अहवाल आपण तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांना सादर केल्याची माहितीही राकेश मारिया यांनी प्रसिध्द केलेल्या पत्रकात देण्यात आली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close