जगभरात #महायोग साजरा

June 21, 2015 4:58 PM0 commentsViews:

21 जून : भारताने जगाला योगची भेट दिली आणि आता यावर्षीपासून 21 जून हा आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून साजरा करण्यात आलाय. आज भारताबरोबरच तैवान, मलेशिया, थायलंड, चीन, फ्रान्स, फिलिपाईन्ससह जवळपास 177 देशांमध्ये योग दिन साजरा करण्यात आला. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या संयुक्त राष्ट्रांचं मुख्यलय असलेल्या न्यूयॉर्कमध्ये योग दिन साजरा करणार आहेत. तर अरूण जेटली सॅन फ्रॅन्सिस्कोमध्ये योग दिन साजरा करणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिका दौर्‍यादरम्यान संयुक्त राष्ट्राने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केलाय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close